हॅपी सॉईल प्रकल्पांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वितरण व विश्लेषण कार्यक्रम आणि सोयाबीन बीजउत्पादन प्रक्षेत्र भेट

 हॅपी सॉईल प्रकल्पांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वितरण व विश्लेषण कार्यक्रम आणि सोयाबीन बीजउत्पादन प्रक्षेत्र भेट


संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि नांदेड कडून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी "हॅपी सॉईल प्रकल्प" देगलूर व बिलोली तालुक्यातील 20 गावातील 2000 शेतकऱ्यांच्या शेतावर राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. प्रकल्पातील बेळकोणी (बु) ता. बिलोली या गावातील 100 शेतकऱ्यांचे माती परीक्षण करण्यात आले होते त्यांना रब्बी हंगाम पूर्व जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण करून विश्लेषण करण्यात आले तसेच जमिनीतील खालावत चाललेला सेंद्रिय कर्ब व त्यावर विविध उपाय योजना बाबत अवगत करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी च्या मार्गदर्शनाखाली अमृतालायम शेतकरी उत्पादक कंपनी लि .कडून खरीप हंगामात सोयाबीन बीजउत्पादन कार्यक्रम राबवण्यात आला त्यात प्रामुख्याने फुले संगम, फुले किमया व फुले ध्रुव या सुधारित वाणाचा समावेश आहे. या बीज उत्पादन कार्यक्रमांमध्ये बेडवर टोकन पद्धतीने लागवड , बीबीएफ पद्धतीचा अवलंब 200 एकर प्रक्षेत्रावर करण्यात आला. पीक बेडवर असल्यामुळे अतिवृष्टी व सततचा पाऊस या परिस्थितीत पीक उत्कृष्ट आले आहे . या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक श्री संजय मुटकुळे व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे होते. तसेच या प्रसंगी तालुका तंत्र व्यवस्थापक श्री. कांबळे व कृषी सहाय्यक श्री. सज्जन उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी सोयाबीन बीज उत्पादन प्रक्षेत्राला भेट दिली व पीक पाहणी केली. या कार्यक्रमासाठी बेळकोणी व परिसरातील 150 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. #fpö #farmer #farm #soyabean #agriculture #kvk #sagroli #rurallife #kvksagroli #nanded #happysoil #soiltesting #healthcare #testing #card





Comments