हॅप्पी साँईल प्रकल्पांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वितरण व विश्लेषण कार्यक्रम आणि सोयाबीन काढणी व साठवणूक करताना घ्यावयाची काळजी मार्गदर्शन
हॅप्पी साँईल प्रकल्पांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका वितरण व विश्लेषण कार्यक्रम आणि सोयाबीन काढणी व साठवणूक करताना घ्यावयाची काळजी मार्गदर्शन...
संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि नांदेड कडून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी "हॅप्पी साँईल प्रकल्प" देगलूर तालुक्यातील येरगि गावात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या गावातील 100 शेतकऱ्यांचे माती परीक्षण करण्यात आले होते त्यांना रब्बी हंगाम पूर्व जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण करून विश्लेषण करण्यात आले तसेच जमिनीतील खालावत चाललेला सेंद्रिय कर्ब व त्यावर विविध उपाय योजना बाबत अवगत करण्यात आले. तसेच सोयाबीनची काढणी व साठवणूक करताना घ्यावयाची काळजी यावर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व पाणलोट क्षेत्र विभाग व्यवस्थापक श्री.वसंत रावणगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी हॅप्पी साँईल प्रकल्प व्यवस्थापक श्री. माधव राजुरे सहाय्यक सुनील भोयवार व पवन जाधव यांनी उपस्थिती होते. या कार्यक्रमासाठी येरगि व परिसरातील 50 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. #fpö #farmer #farm #soyabean #agriculture #kvk #sagroli #rurallife #kvksagroli #nanded #happysoil #soiltesting #healthcare #testing #card




.jpeg)
Comments
Post a Comment