बचत गटांच्या महिलांनी त्यांच्या शेतात होणाऱ्या शेती उत्पादनांवर प्रक्रिया केली असता चांगले उत्पन्न मिळू शकते. योग्य प्रशिक्षण अणि मार्गदर्शन मिळाल्यास महिला उद्योग सुरू करू शकतात.

 बचत गटांच्या महिलांनी त्यांच्या शेतात होणाऱ्या शेती उत्पादनांवर प्रक्रिया केली असता चांगले उत्पन्न मिळू शकते. योग्य प्रशिक्षण अणि मार्गदर्शन मिळाल्यास महिला उद्योग सुरू करू शकतात.

याच उद्देशाने दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि आत्मा, कृषी विभाग, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुदखेड येथे तेथील मुख्य पीक केळी आणि हळद या दोन्ही पिकांच्या प्रक्रिया आणि मूल्यवर्धन याविषयी सविस्तर प्रशिक्षण डॉ. माधुरी रेवणवार यांनी बचत गटांच्या महिलांना देण्यात दिले. केळी पासून चिप्स, जॅम, लोणचे, सुकेळी असे अनेक पदार्थ तसेच हळद प्रक्रिया आणि विविध प्रकारचे मसाले जसे काळा मसाला, गरम मसाला, सांबार मसाला, चिवडा मसाला यांचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले. या प्रसंगी श्रीमती माधुरी सोनवणे, प्रकल्प उप संचालक, आत्मा नांदेड, श्री. गिरी, कृषी विभाग, मुदखेड अणि कृषी विभागातील इतर सहकारी उपस्थीत होते. #farm #sagroli #food #kvk #nanded #rural #women #empowerment #food #processindustry #bussinesswoman #banana

Comments