प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेअंतर्गत महिला शेतकरी गटाचे जिल्हा अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न

 प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेअंतर्गत महिला शेतकरी गटाचे जिल्हा अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न...


नांदेड जिल्ह्यात हळद आणि मिरची लागवड मोठ्या प्रमाणात होते.परंतु शेतकऱ्यांना हळद आणि मिरची उत्पादनातून भरघोस असे उत्पन्न मिळेलच असे नाही. यासाठी त्यावर प्रक्रिया करून हळद पावडर, मिरची पावडर तसेच इतर मसाले तयार केले आणि त्याचे पॅकेजिंग व्यवस्थित करून विक्री व्यवस्थापन योग्य रीतीने केल्यास शेतकऱ्यांना व महिलांना चांगले उत्पन्न मिळू शकते. या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मितीची व नवीन उद्योग निर्माण करण्याची संधी मिळेल. म्हणूनच आत्मा कृषी विभाग आणि संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्ण नांदेड जिल्हा भर मसाला प्रक्रिया व इतर अन्नप्रक्रियेतील संधी आणि त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना व महिलांना लक्षात यावे आणि छोटे उद्योग सुरू व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचे कार्य ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे मसाला प्रक्रिया उद्योगातील संधी, व्यवस्थापन आणि प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला गेला. या प्रशिक्षणासाठी बिलोली तालुका नायगाव आणि धर्माबाद तालुका येथील अनेक महिलांची उपस्थिती होती. प्रशिक्षणा दरम्यान महिलांना हळद मिरची आणि इतर मसाले याबद्दलची सविस्तर माहिती, उद्योग व्यवसायाच्या संधी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रात्यक्षिकाद्वारे महिलांना प्रत्यक्ष मसाले तयार करण्याचा अनुभव देखील देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, श्री. रवीशंकर चलवदे साहेब अणि प्रकल्प उपसंचालक आत्मा प्रकल्प सौ. माधुरी सोनवणे मॅडम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. #trainingprogram #trainingmotivation #womensupportingwomen #womeninbusiness #women #empowerment #empoweringwomen #ruraldevelopment #spices #processing #kvk #sagroli





Comments