गंगामा मंडल पोषण बागेची आखणी...

 गंगामा मंडल पोषण बागेची आखणी...


पोषण बाग तयार करण्यासाठी त्याची आखणी महत्त्वाची असते. गंगा मा मंडल पोषण बागेच्या प्रकाराची आखनी योग्य प्रकारे झाल्यास नंतरची बियाणे लागवड आणि रोपांची लागवड करणे सोयीचे जाते. म्हणूनच, राष्ट्रीय पोषण माह निमित्ताने संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायन्स फाउंडेशन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दौलतापूर ता. बिलोली जिल्हा नांदेड येथे आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी महिलांना पोषण बागेची आखणी करून दाखवण्यात आली. तसेच महिलांना पोषण बागेसाठी लागणारी भाजीपाला बियाणे देण्यात आली. हीच पोषण बाग महिला त्यांच्या उपलब्ध जागेमध्ये शेतामध्ये पुढील आठवड्यात करणार आहेत. #agricultureandfarming #agriculture #kvksagroli #PoshanMaah #POSHANAbhiyaan #gangmaanda #poshan #पोषण #nutrients




Comments