पशुपालक शेतकर्यांसोबत चारापिके आणि आहार नियोजन या विषयावर बैठक संपन्न
पशुपालक शेतकर्यांसोबत चारापिके आणि आहार नियोजन या विषयावर बैठक संपन्न
नायगांव तालुक्यातील मांजरमवाडी येथील पशुपालक शेतकऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत कृषी विज्ञान केंद्र विषयी आणि त्यामार्फत होणाऱ्या विविध कार्याची माहिती सर्व उपस्थित शेतकऱ्यांना दिली. याच अनुषंगाने पशुवैद्यक शास्त्र विषयाच्या प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक आणि स्विकार्य चाचणी साठी शेतकरी निवड करण्यात आली. तसेच चर्चा करताना लंपी त्वचारोग बद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच लंपी रोगावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे कि, बाह्य परजीव नियंत्रण करण्यासाठी निंबोळी आणि करंज तेल फवारणी आणि आजारी जनावरांचे विलगीकरण अश्या उपाययोजनांची माहिती सांगण्यात आली. #Lumpyvirus #LumpySkin #lumpyskindisease #fodder #animal #nutrition #animallover #पशुपालकों #चारापिके #kvk #sagroli #nanded #आहार #नियोजन



.jpeg)
Comments
Post a Comment