विस्तार शिक्षण संचालक वनामकृवी परभणी यांची देगलूर तालुक्यातिल सोयाबीन प्रक्षेत्र व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी च्या अटकळी उपकेंद्राला भेट

विस्तार शिक्षण संचालक वनामकृवी परभणी यांची देगलूर तालुक्यातिल सोयाबीन प्रक्षेत्र व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी च्या अटकळी उपकेंद्राला भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी बी देवसरकर सर आपल्या सहकाऱ्यांसह देगलूर तालुक्यातील सोयाबीन प्रक्षेत्रास भेट दिली त्यांच्यासोबत कृषी विज्ञान केंद्र सगळीच्या शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला. देगलूर गावातील श्री रामराव नाईक यांच्या सोयाबीन प्रक्षेत्राला भेट दिली. सोयाबीन बीज उत्पादनासोबत शेतकऱ्यांनी फळबाग व नगदी पिके (केळी व ऊस ) लागवडीवर भर दयावा असे आव्हान केले. प्रक्षेत्र भेटीनंतर कृषी विज्ञान सगरोळीच्या अटकळी ता. बिलोली येथील उपकेंद्राला भेट दिली व तिथे उभारण्यात आलेल्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळाला भेट देऊन उत्पादनाविषयी अधिक माहिती जाणून घेतली. सुगंधी वनस्पती प्रक्रिया युनिट माध्यमातून जिरेनियम, लेमनग्रास, सिट्रोनिला व पामारोजा लागवडीची माहिती घेतली तसेच उपकेंद्रावरील सोयाबीन बीजउत्पादन प्रक्षेत्राला भेट दिली व कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. या भेटी दरम्यान विद्यापीठातील उद्यान विद्या तज्ञ डॉ. शिंदे व मृदा शास्त्रज्ञ डॉ. धमक कृषी विज्ञान केंद्र सगरोळी शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व डॉ. कृष्णा अंभुरे उपस्थित होते. #agricultureworldwide #vnmkvparbhani #kvksagroli #agriculture #SoyabeanFarming #जैविक #कीड #नियंत्रण #प्रयोगशाळा #biologicalpestcontrol #laboratory #kvk #sagroli #nanded #जिरेनियम #geranium #aromatic #plants #लेमनग्रास #सिट्रोनेला #Citronella #lemongrassoil #processingunit





Comments