शेतकरी महिलांसाठी अन्नप्रक्रियेतील व्यवसायाच्या विविध संधी या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
शेतकरी महिलांसाठी अन्नप्रक्रियेतील व्यवसायाच्या विविध संधी या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम
बदलत्या वातावरणाचा प्रभाव थेट शेती उत्पादनावर म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. वाढती महागाई पाहता शेतकरी कुटुंबामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणे आज अनिवार्य झाले आहे. व्यवसायामध्ये शेतकरी महिला अधिक उत्तम रीतीने कार्य करू शकतात. म्हणूनच शेतकरी महिलांसाठी अन्नप्रक्रियेतील व्यवसायाच्या विविध संधी या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणासाठी कृषी विभाग, आत्मा अंतर्गत शिळवणी तालुका देगलूर येथील 26 महिलांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाच्या विवीध संधी, व्यवसायासाठी आवश्यक प्रकल्प अहवाल बनवणे, कायदेशीर बाबी तसेच पॅकेजिंग आणि लेबलिंग या विषयांवर सविस्तर माहिती डॉ. माधुरी रेवनवार यांनी दिली. तसेच महिलांना कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत चालू असलेले विविध प्रकल्प दाखवून त्याची देखील विस्तृत माहिती प्रा. तुकाराम मंत्रे यांनी दिली. या प्रशिक्षणामुळे महिलांना त्यांचा उद्योग निवडीसाठी नक्कीच मदत होणार आहे. देगलूर आत्मा विभागाकडून सदरील कार्यक्रमासाठी श्री गुंडावार आणि श्री आचमारे हे उपस्थित होते. #trainingprogram #trainingmotivation #womensupportingwomen #womeninbusiness #women #empowerment #empoweringwomen #ruraldevelopment #spices #processing #kvk #sagroli





.jpeg)
Comments
Post a Comment