जनजागृती व जमीन आरोग्य पत्रिका वाटप

 जनजागृती व जमीन आरोग्य पत्रिका वाटप


जनजागृती व जमीन आरोग्य पत्रिका वाटप व विश्लेषण करण्यात आले. गावातील शेतकर्याशी हैप्पी सोईल प्रकल्पाचे ओळख व मुख्य उद्देश ( सेंद्रिय कर्ब वाढ ) व पुढे राबण्यात येणारे उपक्रम यांचे सविस्तर माहिती देण्यात आले.
शेतकर्यांनी सेंद्रिय कर्ब ( Organic carbon ) वाढीव बदल स्वीकारणे काळाची गरज आहे. या प्रकल्पाच्या माधमातून शेतकरी जीवामृत, घनामृत, बीजप्रक्रिया, शेणखताचे महत्व येणाऱ्या काळात केमिकल खताचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सेंद्रिय पद्धत अवलंबून डेंच्या पिकाचा वापर करून जमिनीत सेंद्रिय कर्ब व शाश्वत पिक उत्पनात वाढ होईल अशी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात सेजंन्टा फौंडेशन इंडिया चे समन्वयक श्री. योगेश मंदरने यांनी शेतकर्यांना व गावातील युवकांना बारावी पास व उच्च शिक्षित युवकांना कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत चालणार्या agriculture technology Assistant कोर्स विषयी अवगत करण्यात आले. या भेटीच्या कार्केमात हॅप्पी सॅाईल प्रकल्प व्यवस्थापक श्री माधव राजुरे यांनी कार्क्रमात उपस्थित शेतकर्यांना प्रकल्पाची ओळख व मार्गदर्शन आणि पुढील वाटचालीची माहिती देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी सध्या स्थितीत सोयाबीनचा उरलेला भाग सोयाबीन भूस व कडी कचरा न जाळता त्याचा योग्य वापर करून जमिनीत कंपोष्ट खत म्हणून योग्य उपयोग करावा त्यासाठी लागणारे व लवकर कुज होण्यासाठी बायोलॉजिकल डिक्लचर चा वापर करण्यात यावे अशे आव्हान करण्यात आले. #fpö #farmer #farm #soyabean #agriculture #kvk #sagroli #rurallife #kvksagroli #nanded #happysoil #soiltesting #healthcare #testing #card




Comments