सोयाबीन समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर शेती दिन साजरा...
सोयाबीन समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर शेती दिन साजरा...
संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून राष्ट्रीय तिलबिया पिके अभियान खरीप 2022 अंतर्गत काठेवाडी तालुका देगलूर येथे 20 हेक्टर 50 शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके घेण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला त्यात प्रामुख्याने सुधारित वाण केडीएस 726 फुले संगम, माती परीक्षणावर आधारित खताचा वापर, ट्रायकोडर्मा व एनपीके बीज प्रक्रिया ,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, 5% निंबोळी अर्काचा वापर, कामगंध सापळे व सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2, टोकन पद्धतीने लागवड इत्यादी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. पिकाची पेरणी वेळेवर करण्यात आली. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सतत पावसामुळे पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम दिसून आला व पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आल्यानंतर पावसाचा एक महिना खंड झाला (7 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर ) त्यामुळे पिकावर अनिष्ट परिणाम दिसून आला. श्री नारायण पाटील यांच्या शेतावर पिक पाहणी व शेती दिन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ज्या शेतकऱ्यांनी बीबीएफ किंवा टोकन पद्धतीने लागवड केली त्यांचे पीक उत्तम परिस्थितीत आढळून आले, त्यावर अतिवृष्टी किंवा कोरडा दुष्काळ याचा अनिष्ट परिणाम दिसून आला नाही. या पीक पाहणी नंतर पुढील हंगामात सोयाबीन लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी टोकन किंवा बीबीएफ पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. या पिक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांसोबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व सहकारी श्री माधव राजुरे व श्री संतोष भोईवार व काठेवाडी व होटल परिसरातील 56 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. #soyabean #farming #BBF2022 #farm #farmersfields #सोयाबीन





.jpeg)
Comments
Post a Comment