खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन या विषयी केदार वडगाव ता. नायगाव येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन या विषयी केदार वडगाव ता. नायगाव येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि नाबार्ड पुरस्कृत एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाद्वारे अवक्रमित मातीचे पुनर्वसन व हवामान अनुकूल बदल कार्यक्रम प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन या विषयी केदार वडगाव ता. नायगाव येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. गंगाधर कानगुलवार यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना करताना विविध पिकावरील किड व रोगांची सद्यस्थितीबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान डॉ. कृष्णा अंभुरे यांनी सोयाबीन पिकावर सध्या होत असलेल्या रायझोक्टोनीया एरियल ब्लाईट या रोगाविषयी माहिती दिली आणि सद्यस्थितीत करायच्या उपाययोजना सांगितल्या. कापूस पिकातील किडींबद्दल माहिती देताना विविध रसशोषक किडी आणि गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा व त्यांचे एकात्मिक किड व्यवस्थापन करताना चिकट सापळे, कामगंध सापळे, निंबोळी अर्काची फवारणी, शिफारशीतील किटकनाशकांची फवारणी या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. हळद पिकात सध्या होणारा कंदमाशीचा प्रादुर्भाव तसेच करपा व कंदकुज या रोगांबद्दल माहिती देऊन सद्यस्थितीत करायच्या उपाययोजना या बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांसोबत चर्चासत्र करुन त्यांच्या शंकांचे निरसण केले. #pest #training #climateresilientagriculture #diseasecontrol #किडी #रोग #कापूस_उत्पादक_




.jpeg)
Comments
Post a Comment