लंपी त्वचारोग माहितीप्रसार व जनजागृती अभियानाला सुरुवात
लंपी त्वचारोग माहितीप्रसार व जनजागृती अभियानाला सुरुवात
राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणा राज्यात पसरलेल्या लंपी त्वचारोगाचा शिरकाव महाराष्ट्रात काही ठिकाणी झाल्याचे आढळून आले आहे. मागे दोन वर्षांपूर्वीही हा रोग महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर पसरला होता आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे बाधित झाली होती याच पार्श्वभूमीवर सध्याच्या राज्यातील जनावरांमध्ये हा रोग पसरू नये म्हणून सगळीकडे प्रयत्न सुरू झाले आहेत. याच अनुषंगाने, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे बिलोली तालुक्यातील विविध गावांमध्ये लंपी त्वचारोग व माहितीप्रसार व जनजागृती अभियाना ची सुरुवात करण्यात आली. या निमित्ताने तालुक्यातील बेळकोणी बुद्रुक व कासराळी येथे आज कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमा वेळी पशुपालकांना लंपी त्वचा रोगाची माहिती, त्याचा रोगप्रसार, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच प्रथमोपचार पद्धती विषयी माहिती देण्यात आली. जनावरांमध्ये लंपी सदृश्य लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये माहिती देण्यासाठी आवाहन ही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दोन्ही गावातील ग्रामपंचायत आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी तत्परता दाखवत आयोजन करण्यास सहकार्य केले तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी यांनीही या निमित्ताने पशुपालकांशी संवाद केला आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन दिले. याच अभियानाद्वारे तालुक्यातील सगरोळी दौलतापुर डोणगाव व बामणी तसेच देगलूर तालुक्यातील आदमपूर या ठिकाणीही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा अशी सर्वांना विनंती. #LumpySkin #LumpyVirus #lumpyskindisease #lumpyskinvirus #lumpy #kvk #sagroli #nanded #लंपी #लंपी_वायरस #लंपी_त्वचारोग PMO India : Report Card Nitin Gadkari Narendra Modi


.jpeg)


.jpeg)
Comments
Post a Comment