बाळ पोटात वाढत असताना पासून त्याच्या आहार आणि आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्याच्या पुढील आयुष्यामध्ये तो सुदृढ राहील…डॉ. प्रदीप सायनोड

बाळ पोटात वाढत असताना पासून त्याच्या आहार आणि आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्याच्या पुढील आयुष्यामध्ये तो सुदृढ राहील…डॉ. प्रदीप सायनोड


आहार आणि पोषण हे मानवी जीवनातले अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. योग्य आहार असेल तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो. अन्यथा अनेकविध आजारांनी ग्रासल्यानंतर वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने महिला आणि किशोरवयीन मुली यांच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम यांच्या कमतरतेमुळे होणारे रक्तक्षय व हाडांचा आजार हा बळावला जातो. आपला आहार आणि पोषणाचे महत्त्व लक्षात घेऊन सशक्त भारत निर्मितीसाठी मागील काही वर्षांपासून सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात वृक्षारोपण, पोषण बाग निर्मिती, आहार मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिर, आहर आणि आरोग्य संदर्भामध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड यांच्यामार्फत देखील राबविली जातात. याचाच एक भाग म्हणून 17 सप्टेंबर या दिवशी सर्वत्र वृक्षारोपण आणि मार्गदर्शन कार्यक्रम देखील आयोजित केली जातात. संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी वृक्षारोपण आणि आहार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमांमध्ये सगरोळी आणि परिसरातील गावांमधील बहुसंख्य महिलांनी आणि किशोरवयीन मुलींनी उपस्थिती दर्शवली. सदरील कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र, IFFCO नांदेड आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सौ श्रद्धा रोहित देशमुख या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्रदीप सायनोड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर आणि होट्टल तसेच डॉक्टर श्रद्धा लकडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सगरोळी हे होते. तसेच इफको तर्फे श्री घाटगे आणि आय पी एल तर्फे श्री गरड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या पुर्वी मान्यवरांच्या हस्ते दुर्मिळ अश्या पिवळ्या अणि पांढऱ्या पळसाच्या रोप लागवड करण्यात आली. केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या युट्युब लिंक च्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉक्टर प्रदीप सायनोड यांनी बाळ पोटात वाढत असताना पासून त्याच्या आहार आणि आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्याच्या पुढील आयुष्यामध्ये तो सुदृढ राहील असे सांगितले. तसेच डॉक्टर श्रद्धा लकडे यांनी किशोरवयीन मुलींच्या आहाराने आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. इफको चे नांदेड जिल्हा प्रमुख श्री घाटगे यांनी इफको मार्फत महिलांना पोषण बागेचे भाजीपाला बियाणे आणि लिंबू रोपे दिले. डॉ माधुरी रेवणवार यांनी भाजीपाल्याच्या पोषण बागेचे महत्त्व सांगत प्रत्तेक गावात गांगमा मंडळ या प्रकारच्या बागेचे प्रशिक्षण आयोजित करणार आहोत असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऊषा बानबले यांनी केले तर आभार किशोर काळे यांनी मानले. #PoshanMaah2022 #nutrition #RashtriyaPoshanMaah #azadikaamritmahotsav2022 #POSHANAbhiyaan #IFFCO #internationalyearofMillets2023 #WomensHealth #kvksagroli #nanded #ruralwomen #agriculture









Comments