कामगंध सापळ्याव्दारे गुलाबी बोंडअळीच्या पतंगांचे समुह आकर्षण व अटकाव....

कामगंध सापळ्याव्दारे गुलाबी बोंडअळीच्या पतंगांचे समुह आकर्षण व अटकाव....


कापूस हे नांदेड जिल्हातील एक प्रमुख नगदी पिक आहे. कापूस पिकावर विविध किड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. गुलाबी बोंडअळी ही कापूस पिकावरील सर्वात महत्वाची किड असून कापसाच्या उत्पादनात सर्वात जास्त घट ह्या किडीमुळे होते. कामगंध सापळ्याव्दारे गुलाबी बोंडअळीच्या पंतंगांचे समुह आकर्षण करुन त्यांचा अटकाव करण्यासाठी काटकळंबा ता. कंधार येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी कामगंध सापळ्यांचे महत्व, सापळे लावण्याची योग्य पद्धत, ल्युर बदलण्याची योग्य वेळ ई. विषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ३५ शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर "कामगंध सापळ्याव्दारे गुलाबी बोंडअळीच्या पतंगांचे समुह आकर्षण व अटकाव" या स्विकार्य चाचणीसाठी (OFT) सर्वानुमते १५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना एकरी १५ कामगंध सापळे आणि ३० ल्युर चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी श्री. गंगाधर कानगुलवार आणि श्री. अविनाश जोगी यांचे सहकार्य लाभले. #trainingday #trainingprogram #empowerment #crops #cotton #कामगंध_सापळे #कापूस_उत्पादक_





Comments