लंपी त्वचारोग माहितीप्रसार आणि जनजागृती अभियान

लंपी त्वचारोग माहितीप्रसार आणि जनजागृती अभियान 


आज दिनांक १३/०९/२०२२ रोजी लंपी त्वचारोग माहितीप्रसार आणि जनजागृती अभियान अंतर्गत सगरोळी आणि बामणी (ता. बिलोली) येथे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सगरोळी येथे शालेय मुलांना देखील माहिती देण्यात आली, जेणेकरून त्यांच्यामार्फत त्यांच्या पालकांना देखील लंपी त्वचारोग बद्दल माहिती पोहोचेल. तसेच दोन्ही गावात कार्यक्रम नंतर बाह्य परजिव नियंत्रण करण्यासाठीची औषधे तालुका पशुवैद्यकीय दवाखाना मार्फत देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य आणि कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी मार्फत करण्यात आले होते. #lumpyskindisease #LumpyVirus #animal #animalcare #लंपी #LUMPY #LumpyVirus #virus #kvk #sagroli #nanded #awarnesscampaign








Comments