ग्रामीण तरुणांना त्यांच्या नियमित कामांसोबतच अतिरिक्त व्यवसाय करून उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे

 ग्रामीण तरुणांना त्यांच्या नियमित कामांसोबतच अतिरिक्त व्यवसाय करून उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे 


ग्रामीण तरुणांना त्यांच्या नियमित कामांसोबतच अतिरिक्त व्यवसाय करून उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे म्हणून इतर पर्यायी व्यवसायांचा शोध घेताना अनेक जण आपल्या निदर्शनास येतात. शेतमजुरी, सालगडी आणि शेती या कामांना करता करता अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत किंवा व्यवसाय करणे अनेकदा अवघड ठरते. यासाठी शेतीपूरक व्यवसाय निवडणे आवश्यक आहे. म्हणूनच सगरोळी परिसरातील काही ग्रामीण तरुणांनी एकत्र येऊन म्हशींपासून दुग्ध व्यवसाय करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी कडून या तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तांत्रिक सहाय्यता देण्यात येणार आहे.
याच अनुषंगाने दुग्ध व्यवसाय करताना चांगल्या गुणवत्तेच्या आणि खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या दुधाळ म्हशींची निवड अत्यावश्यक गरजेची आहे म्हणून दि. 03/09/22 रोजी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळीतील पशुवैद्यक शास्त्र विषय विशेषज्ञ आणि सहायक यांनी साठापुर, ता. बोधन ( तेलंगणा) येथील साप्ताहिक पशू बाजारास भेट दिली. साठापुर बाजार हा म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. या दरम्यान सुमारे 500 ते 700 म्हशींची बाजारात खरेदी - विक्री व्यवहार होतात असे सांगण्यात येते. प्रामुख्याने या ठिकाणी मुऱ्हा, जाफराबादी, मराठवाडी आणि मिश्र जातीच्या म्हशी पाहायला मिळतात. म्हशींची शारीरिक स्तिथी, कासेचा आकार, शारीरिक ठेवण आणि दूध वहिनी ( milk vein) यांची पाहणी करून निवड केली जाते. या भेटी दरम्यान बाजारभाव आणि म्हशींची गुणवत्ता इत्यादी गोष्टींची माहिती घेण्यात आली. #animal #milk #RuralEmpowerment #youth #agribusinesses #agribusinesstalk #AgriBusinessManagement #म्हैस #दुग्ध_व्यवसाय_उत्तम_व्यवसाय❣️🤩✌️ #दुग्ध_व्यवसाय

Comments