शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणातून सेंद्रिय कर्ब आणि एकात्मिक अन्नद्रव्य वाढवणे ही काळाची गरज (Happy Soil)
शेतकऱ्यांनी मृदा परीक्षणातून सेंद्रिय कर्ब आणि एकात्मिक अन्नद्रव्य वाढवणे ही काळाची गरज - (Happy Soil)
संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी अंतर्गत हॅप्पी साॅईल या प्रकल्पाद्वारे आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी कार्ला (बु) ता. बिलोली येथे जमीन आरोग्य पत्रिका वितरण व सद्यस्थितीतील खरीप पिकांच्या एकात्मिक कीड, रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला यासाठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञांची उपस्थिती होते, त्यामध्ये उद्यान विद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.संतोष चव्हाण यांनी खरीप हंगामातील फळबाग व भाजीपाला लागवडसोबतच अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर उपस्थितांसी संवाद साधत सखोल असे मार्गदर्शन केले. सिजेंटा फाउंडेशन इंडिया चे श्री.गणेश भुसनर यांनी पिकांची फवारणी करत असताना घ्यावयाची काळजीबरोबरच कीड व रोग व्यवस्थापन याविषयी संवाद साधला माती परीक्षणाचे महत्व व मृदा आरोग्य पत्रिकेचे विश्लेषण विषयावर मृदा परीक्षण प्रयोगशाळेतील सहाय्यक श्री.प्रवीण मिणके यांनी उपस्थित शेतकरी बांधवांसी संवाद साधला. तसेच या प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.माधव राजुरे यांनी हॅपी साॅईल या प्रकल्प विषयी उपस्थितांसी संवाद साधला या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. #Happy_Soil #soil #testing #water #farm #farmer #agriculture #kvk #sagroli #nanded #agri #agricultureworld #AzadiKaAmritMahotsav





.jpeg)
Comments
Post a Comment