कृषी महाविद्यालय नायगाव येथील अंतिम वर्षातील ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योग सलग्नात (RAWE &AIA) अंतर्गत विद्यार्थ्यांची कृषी विज्ञान केंद्राला भेट....


दि.1 व 2 सप्टेंबर 2022 रोजी कृषी महाविद्यालय नायगाव बाजार येथील अंतिम वर्षातील ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योग संलग्नता (RAWE & AIA) अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे भेट देऊन कृषी विज्ञान केंद्राची कार्यप्रणाली, प्रक्षेत्र भेट, तसेच विविध प्रात्यक्षिक युनिटला भेट देऊन माहिती घेतली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी केवीके प्रक्षेत्रावरील बीज उत्पादन कार्यक्रम, भाजीपाला व फळबाग नर्सरी, रेशीम शेती, उस्मानाबादी शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय व दूध संकलन केंद्र, भाडेतत्त्वावरील अवजारे बँक, निंबोळी प्रक्रिया उद्योग, बीज प्रक्रिया केंद्र,अन्नप्रक्रिया केंद्र , गारमेंट सेंटर, कृषी निविष्ठा व सेवा केंद्र इत्यादी युनिटला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. या दोन दिवशी भेटीत 130 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. कृषी विज्ञान केंद्राची दोन दिवशी भेट कृषी पदवीधरांना कृषीउद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत व्यक्त केले. दोन दिवसीय भेटीदरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली. #students #agritech #agribusiness #kvk #sagroli #nanded #farming #researchstudy #AIA #rawe #visit








Comments